राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी कशी करावी ?

महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोण आता बदलत आहे, शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत एमपीएससी परीक्षेबद्दलची माहिती आता पोहचू लागली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडे आता जास्त कल दिसू लागला आहे. दरवर्षी शेकडो मुले सखोल अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देण्यासाठी उतरत आहे. सतत व जिद्दीने अभ्यास करून काही तरुन या परीक्षेत लक्षणीय यश संपादित करीत आहे. त्यामुळे एमपीएससी ची तयारी करतांना विद्यार्थ्याच्या अंगी सकारात्मक दृष्टीकोण असणे खूप आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टीकोण असेल तरच हमखास यश प्राप्त होऊ शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेकडे जास्त वळत असून त्यांच्या यशाचे प्रमाण हे दिवसे न दिवस वाढत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू लागले आहे.
काय आहे एमपीएससी परीक्षेची पात्रता ?

एमपीएससी ची परीक्षा तुम्ही १८ वर्ष पूर्ण झाल्यावर देऊ शकता
पदवी पूर्ण झाली पाहिजे.
कसा करावा एमपीएससी चा अभ्यास ?
गेल्या काही वर्षापासून आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल बदलला असून आता थेट प्रश्न न विचारता त्या विषयातील सखोल ज्ञान विद्यार्थ्याला आहे का यासबंधी प्रश्न विचारले जात आहे. अभ्यासक्रमात जारी बादल नसला तरी आयोगाने प्रश्नपत्रिकेत बदल केला आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांनी हे समजून घेतल्यास त्यांना अभ्यास करण्यात मदत होईल व त्यांना याचा फायदा होईल. कोचिंग क्लास न लावता ही अभ्यास केला जाऊ शकतो. आणि पास होऊ शकता. तुमच्याकडे योग्य मार्गदर्शन असेल तर तुम्ही एमपीएससी ची परीक्षा पास होऊ शकता. पदवी पूर्ण झाल्यावर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर १०वी पास झाल्यानंतरच तुम्हाला एमपीएससी च्या परीक्षेचा अभ्यास चालू करावा लागेल तेव्हाच तुम्ही पदवी झाल्यानंतर एखादी आयोगाची परीक्षा पास करू शकता. कारण जीवनात सर्व काही सोप्पं नसते, काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी सर्वात आधी आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी समोर प्रयत्न करावे लागते आणि ते प्रयत्न सातत्याने चालू ठेवावे लागते उपयशाने खचून न जाता समोर जात राहावे लागते.
सर्वप्रथम ५वी ते १२वी पर्यंतची राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तके व्यवस्थित वाचावीत. त्यातील प्रत्येक मुद्दा समजून घ्यावा , जर शक्य असेल तर कमीतकमी शब्दात नोट्स तयार करायची सवय लावावी जेणेकरून ते समोर तुमच्या कमी येईल. नवीन अभ्यासक्रमाची जी पुस्तके आहे , ती पुस्तके राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व या पुस्तकांचा अभ्यास केला तर कोणताही विषय समजण्यास सोपे जाते. जर विषय आपल्याला समजला तर तो सोडविणे शक्य होते नाहीतर परीक्षा सोडवितांना गोंधळ निर्माण होतो. अभ्यासतील मुद्द्यांचा चांगला अभ्यास झाला तर त्यावर सखोल माहिती लिहिता येते. व अभ्यासाची दिशा चौकट नाही. अभ्यास करतांना पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा यांचा मुद्देशीर अभ्यास करा म्हणजे तुम्हाला ते सोडवितांना शंका निर्माण होणार नाही आणि पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षा लवकर असेल तर लवकरात लवकर अभ्यास होण्यास मदत होते. अभयस करतांना दर्जेदार पुस्तके वाचल्याने जास्त फायदा होतो. नाहीतर उगाच कोणत्याही पुस्तकांचा अभ्यास केला तर तो निरर्थक ठरतो.
चालू घडामोडीचा अभ्यास करणे तितकेच महत्वाचे आहे. कारण ते प्रश्न किती विचारले जातील याची जारी शाश्वती तरी त्या ज्ञानाशिवाय एमपीएससी पास होणे कठीणच आहे.
वेळेचे नियोजन कसे कराल ?

मित्रांनो एमपीएससी चा अभ्यास करतांना वेळेचे नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे ठरवणे सुदधा आवश्यक आहे. एमपीएससी चा अभ्यास करतांना पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असे दोन विभाग करून त्यांना कसा वेळ द्यायचा याचे नियोजन केला तर त्याचा फायदा समोर दिसुन येतो. मित्रांनो एमपीएससी पास होण्यासाठी खूप १६,१७ तास अभ्यास करावाच लागतो असेच नाही जर अभ्यास व्यवस्थित आणि मुद्देशीर असेल तर कमी वेळात अभ्यास करूनही एमपीएससी पास करता येते. अभ्यास करतांना स्वताला सपूर्णपणे  झोकून अभ्यास करावा लागतो तेव्हाच तो अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा देऊ शकतो.
प्रेरणादायी पुस्तके वाचा.
मित्रांनो अभ्यास करतांना कधी कधी लवकर यश मिळत नाही तेव्हा कधी कधी स्वतचे खच्चीकरण होते व असे वाटते की अभ्यास करणे सोडून द्यावे व दुसरे काहीतरी करावे, अशा वेळी खचून न जाता प्रेरणादायी पुस्तके वाचावीत ज्यातून तुम्हाला पुन्हा संघर्ष करण्याची जिद्द येईल व तुमचे खच्चीकरण होणार नाही. त्याच बरोबर आज तुम्ही इंटरनेटच्या युगात आहात त्याचा पूर्ण उपयोग घ्या, जेव्हा तुम्हाला पुस्तके वाचायला त्रास येईल तेव्हा तुम्ही युट्यूब वर जाऊन एमपीएससी सबंधित विडियो पाहून देखील अभ्यास करू शकता. त्याच बरोबर प्रेरणादायी व्याख्याने देखील पाहून आपला आत्मविश्वास वाढवू शकता. त्याचबरोबर ठिकठिकाणी होणार्‍या प्रेरणादायी व्याख्यानाला जाऊन तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.
अभ्यासचे आकलन व उजळणी.

मित्रांनो आपण केलेला अभ्यास आपल्याला किती समजला व किती लक्षात आला यासाठी आपल्याला आपण केलेल्या अभ्यासाचे आकलन व अभ्यासाची उजळणी करणे गरजेचे आहे. आकलन व उजळणी केल्यामुळे आपण केलेल्या अभ्यासाची मुद्दे पुन्हा वाचनात आल्यामुळे ते आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहण्यास मदत होते.  त्याचबरोबर प्रत्येक विषयात आवड निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे अभ्यासात मन लागते व चांगला अभ्यास होण्यास मदत होते. मित्रांनो आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही रोज योगासने व ध्यान करा. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेलच परंतु त्याच बरोबर शरीरात रक्त पुरवठा बरोबर होऊन तुमच्या शरीराची स्फूर्ति वाढेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *