राजुरा निर्वाचण क्षेत्रात रासायनिक खते व औषधीचा पुरवठा त्वरित करा.: संजय धोटे यांची मागणी

राजुरा निर्वाचण क्षेत्रातील चार तालुक्यात शेतकऱ्यांना वेळेअभावी रासायनिक खते व औषध मिळत नसल्याची बाब जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांच्या लक्षात आणून वास्तविक बघता कुषी केंद्र मध्ये रासायनिक खते व औषधचा तुटवडा असून त्यांच्या मागणी नुसार खते मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे. शेतकऱ्यांना सद्यस्थितीत रासायनिक खतांच्या व औषधी करिता दुकानात जाऊन परत यावे लागत असल्याने पेरणी व शेतकरी हंगामात आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे नाही आहे. त्यामुळे राजुरा निर्वाचण क्षेत्राकरिता प्रत्येकी आजच्या स्थितीत ४२ हजार मेट्रीक टन पेक्षा जास्त खते उपलब्ध करून द्यावित जेनेकरुण सर्वत्र तालुक्यातील शेतकऱ्यांना खते मिळाल्याने दिलासा देणारी बाब ठरेल. जास्त प्रमाणात कालावधी झाल्यास शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. कारण या हंगामात पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या पुर्ववत कामाच्या ठिकाणी खते घेऊन जाण्यास पण त्रास सहण करावा लागू शकतो. या संदर्भातील गरज लक्षात घेता त्वरित हि मागणी पुर्ण करावी अशी विनंती प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माझी आमदार संजय धोटे यांनी केली आहे.

तसेच राजुरा निर्वाचण क्षेत्रातील सेवा सहकारी संस्था नी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा त्वरित करून शेतकऱ्यांचे शेअर्सच्या रक्कमेचा लाभ त्वरित द्यावा. दरवर्षी शेतकऱ्यांकडून शेअर्स कापले जातात मात्र ते अजूनही परत देण्यात आले नाही. सोसायटी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रण खाली येत असून दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे शेअर्स ची रक्कम एकतर २०००० रुपये प्रत्येक शेतकऱ्यांचे जमा झाल्यास परत शेतकऱ्यांना करायचे असे नियम ठरले आहे. आदिवासी सेवा सहकारी संस्था देवाडाचे कर्जदार शेतकरी यांनी अनेकदा शेतकऱ्यांनी संस्थाचे सचिव व जिल्हा मध्यवर्ती बँका राजुराकडे अनेकदा शेअर्स रक्कमेची परतीची मागणी केली. परंतु पंधरा वर्षांत एकदाही ही रक्कम शेतकऱ्यांना परत केली जात नाही.वा दिली नाहीत. असे प्रकार सर्व तालुक्यातील सेवा सहकारी संस्थामध्ये सुरू आहेत.           

प्रत्येक शेतकऱ्यांचे शेअर्स किती जमा झाले हे दाखवणारे रेकॉर्ड ,पावती ,किवा तत्सम प्रमाणपत्र सुध्दा शेतकऱ्यांना दिले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे करोडो रुपयाचे नुकसान होत आहेत. शेतकऱ्यांचे व्यवहार बाबत सहकारी बँक व सेवा सहकारी सोसायटीचे कारभारत पारदर्शकता दिसून येत नाहीत. शेतकरी आपल्या अधिकारा पासून वंचित असुन त्याचे शोषण केल्या जात आहे. हा सर्वत्री अन्याय असून  या बाबतीत चौकशी होणे आवश्यक आहे. व शेतकऱ्यांना उपरोक्त रक्कम परत मिळणे न्यायोचित आहेत.. या संदर्भातील त्वरित चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावात हि मागणी संजय धोटे माजी आमदार राजुरा यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *