रखडलेली महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना पुन्हा होणार सुरू

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना चालू केली होती. मात्र पुरेसा निधि न मिळाल्याने ही योजना ठप्प पडली होती. आता मात्र कर्जमाफी न मिळालेल्या शेतकर्‍यांना  मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील सव्वा एकरा लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी जुलै अखेरीपर्यंत होणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले, “कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील सव्वाअकरा लाख शेतकर्‍यांना जुलै अखेपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी निधी अभावी ठप्प झाली होती. त्यामुळे राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी होऊ शकली नाही. राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना बँकांना दिल्या होत्या. मात्र हे शेतकरी आपली कर्जमाफी कधी होणार याची वाट बघत होते. आता राज्याच्या सहकार विभागाने या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जुलै अखेपर्यंत या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल.”

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात कोविड-19 चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. कोविड-19 चा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला.”

“महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.”

ज्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, असंही आवाहन सहकार मंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोविड-19 च्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज द्यावे अशा सूचनाही शासनाने बँकांना दिल्या होत्या असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा
↓↓
वीजबिलात ५० टक्के सूट द्या, मनसेच्या शिष्टमंडळाची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *