येस बँकेवर आलेल्या निर्बंधामुळे शेतकर्‍यांनाही फटका.

गेल्या महिनाभरापासून येस बँक ची आर्थिक स्थिती खूप डबघाईस आली आहे. त्यामुळे येस बँकेच्या व्यवहारावर निर्बंध लादण्यात आले आहे. यामुळे आता मोठ्या व्यवसाईकांसोबत शेतकर्‍यांचे  नुकसान होत आहे . शेतकर्‍यांचा  जास्तीत जास्त पैसा हा जिल्हा बँकेत असतो आणि जिल्हा बँकेचा IFSC CODE हा येस बँकेचा आहे त्यामुळे शेतकर्‍यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सीसीआयला टाकलेल्या कापसाचा पैसा थांबला.
यंदा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपला कापूस सीसीआय ला विकला कापसाचा पैसा हा ऑनलाइन पद्धतीने महिनाभराच्या कालावधीत शेतकर्‍यांच्या  खात्यावर जमा करण्यात येते. ज्या शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेचे खाते जोडले असेल त्यांचे पैसे खात्यात जमा होत नाही आहे  कारण जिल्हा बँकेचा IFSC CODE हा येस बँकेचा आहे त्यामुळे शेतकर्‍यांचा  कापसाचा पैसा थांबला आहे.


महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *