येत्या १५ जूनपर्यंत शाळा चालू होण्याची शक्यता. : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

कोरोंनाने आपल्या विळख्यात सर्वांना पकडलं असून याचा सर्वात मोठा फटका शिक्षण व्यवस्थेला बसला आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा केव्हा सुरु होणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा येत्या १५ जूनपासून सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. रेड झोन वगळता इतर भागांमध्ये शाळा सुरु करण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत, असे वर्षा गायकवाड यांनी संगितले आहे. विद्यार्थ्यांना सम विषम रोलनुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलवण्याचा विचार केला जात आहे. दुसरा पर्याय म्हणजे प्रत्येक पर्यायी दिवशी वर्गातील विद्यार्थ्यांच्या तुकडीला कॉल करून त्यांना सांगायचं की, कोणत्याही परिस्थितीत सामाजिक अंतर ठेवणं. एका डेस्कवर फक्त एका विद्यार्थ्याला परवानगी देण्यात येईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत

शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी सरकारनं नवीन मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) तयार केली आहे. परंतु मुंबईतील रेड झोनमध्ये असलेल्या इतर शाळांमदध्ये याचा विचार होऊ शकत नाही. दरम्यान कोरोनामुळे सर्वच ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पालक देखील शाळा सुरु झाली तरी मुलांना शाळेत पाठवण्यात थोडेसे घाबरतील. कारण मुलांकडून सामाजिक अंतरण पाळणे काहीसे कठीण आहे. मुलं खेळण्याच्या नादात एकमेकांना स्पर्श करू शकतात. त्यामुळे अनवधानाने संसर्ग होण्याचा धोका आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकार काय निर्णय घेणार लक्ष घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *