येत्या दहा दिवसांत सार्वजनिक वाहतूक होणार सुरू.: नितीन गडकरी

सार्वजनिक वाहतुकीची संबंधित केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दहा दिवसात देशातील सार्वजनिक वाहतूक सुरू होणार आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले की सार्वजनिक वाहने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बंद करण्यात आली होती. येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यात येईल. यासाठी सार्वजनिक वाहतूक विभागाकडून गाईडलाईन तयार करण्याचा विचार सुरू आहे तसेच त्यांच्या विभागाकडून गाईडलाईनचे पालनही करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राज्य सोबत केंद्राच्या समन्वय याबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की ही राजकारण करण्याची वेळ नाही आहे. देशाला संकटातून बाहेर काढून भारताला महासत्ता होण्याच्या भूमिकेवर सर्वांचे एकमत आहे. भारताला महासत्ता बनवण्यासाठी कुठलेही राजकीय मतभेद नाहीत. आम्ही कुणीच सध्या राजकीय मतं व्यक्त करत नाहीत. मी महाराष्ट्रात आहे. दर दोन तीन दिवसांनी मी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी बोलतो. माझ्या काही सूचना असतात त्या दोतो. पंतप्रधान मोदी देखील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद करत आहेत, असं गडकरी यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थितीवर बोलतांना गडकरी म्हणाले की महाराष्ट्र आणि मुंबई संकटात आहे त्यावर मात करायची असून आम्हीं सर्व मिळून संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करत अहो. आणि लवकरच महाराष्ट्रासह देशाला संकटातून बाहेर काढू. असेही ते त्यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *