युवकांनी तयार केली पक्षांसाठी घरटे नांदा फाटा येथील युवकांचा उपक्रम..

प्रतिनिधी,
आवाळपुर
भारत देशात सद्या कोरोनाने थैमान घातला आहे. लोक घरात सुरक्षित राहत आहे. मात्र पशू-पक्षी बाहेर निवांत वावरू लागले आहे. परंतू जिल्हात उन्हाचा पारा भडकला असून माणसाला याचे चटके जाणवू लागले आहे. याची झळ पशू-पक्षी यांना सुध्दा पोहचू लागली आहे. यामुळे नांदा फाटा येथील शिवजन्मोत्सव समिती युवकांनी पक्षांची घरटे तयार करून प्राणी मात्रेवर दया करण्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

जिल्हात उन्हाची चाहूल लागली आहे. उन्हात जीव कासावीस होवू लागला आहे. मानवा वर ही परिस्थिती ओढवली आहे तर पक्षाचं काय होत असेल याचाच विचार करून शिवजन्मोत्सव समिती येथील युवकांनी रक्कम गोळा करून त्यांनी लोकसहागातून तब्बल 40 प्लायवुड ची घरटे तयार केली. एवढ्या वरच ते थांबले नाही तर त्यांनी वार्डा तील इच्छुक व्यक्तींना घरटे देवून पक्षी यांची निघा राखा पक्षी हे निसर्गाचा एक भाग आहे. त्याचे सुध्दा प्राण अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे प्राणी मात्रेवर दया करा असा आगळा वेगळा संदेश युवकांनी दिला.

युवकांनी सद्या 40 घरटे तयार केले असून ती वार्ड मध्ये दिली आहेत. पुढे त्यांनी 100 घरटे तयार करण्याचे नियोजन केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *