‘या’ ठिकाणी मिळणार दहावी पास झाल्यास मिळणार २० हजार आणि महाविद्यालयांत विनामूल्य प्रवेश

विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोणातून आसाम सरकारने मोठा निर्णय घेतला असून त्यासाठी आसाम सरकारने मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांवरील शिक्षणासाठी लागणारे आर्थिक ओझे कमी होणार आहे. आसाम सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार राज्यात विद्यमान शिक्षण वर्षात बारावीपासून ते पदव्युत्तरपर्यंतच्या विद्यार्थांना मोफत महाविद्यालयांत प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यालयासह तंत्रद्यान संस्थांमध्ये देखील विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.

आसाम राज्याचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा यांनी या विद्यार्थ्यांच्या हिताच्या निर्णयाची घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या हित लक्षात घेता शिक्षणमंत्री बिस्वा यांनी अनेक घोषणा केल्या आहे. सरकारी वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये व पुस्तकांसाठी एक हजार रुपये देण्यात येणार आहे. पूर्वी ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख पेक्षा कमी आहे. त्यांना मोफत प्रवेश मिळत होता आता मात्र राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. तसेच जे विद्यार्थी १० वी उत्तीर्ण होईल त्या प्रत्येक विद्यार्थ्याला २०-२० हजार दिल्या जाणार आहे. त्यामुळे शिक्षण घेण्यार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांवरील आर्थिक ओझे कमी होणार आहे.

हेही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *