….याला म्हणतात चार आणेची कोंबडी आणि बारा आणेचा मसाला

सध्याच्या स्थितीत देशात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असला तरी देशातील लोकं आपल्या आवडत्या वस्तू साठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहे. हिमाचल प्रदेशमधील एका खाजगी कंपनीने ६० ते ८० हजार रुपयाच्या स्कूटरसाठी व्हीआयपी नंबर मिळावा म्हणून तब्बल १८ लाख रुपयांची बोली लावली आहे. हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील शाहपूर येथील हा प्रकार असून, खाजगी कंपनी राहुल पॅम प्रायव्हेट लिमिटेडने एक नवीन स्कूटरची शाहपूर येथे कंपनीच्या नावाने नोंदणी केली आहे.

‌एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला या स्कूटरसाठी ९०-०००९ हा नंबर हवा होता. हा व्हीआयपी नंबर मिळविण्यासाठी कंपनीने सरकारद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ऑनलाईन बोलीमध्ये भाग घेतला होता. एक आठवडा चाललेल्या या बोलीत कंपनीने व्हीआयपी नंबरसाठी सर्वाधिक तब्बल १८ लाख २२ हजार ५०० रुपयांची बोली लावली गेली. त्यामुळे हा प्रसंग पाहून याला चार आणेची कोंबडी आणि बारा आणेचा मसाला असं म्हणायची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *