…. म्हणून भारतातील ८३ टक्के कोरोनारुग्ण होणार बरे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात वेगाने वाढत असतांना मात्र भारतात कोरोनाचे प्रमाण कमी असून कोरोनापासून बरे होण्यार्यान रुग्णांची संख्याही मोठी आहे. भारतात कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षण दिसून आले नाही परंतु त्यांची चाचणी मात्र पोझीटीव्ह आली आहे. यामध्ये बहुसंख्य रुग्ण हे तरुण वयोगटातील असल्याची माहिती आयसीएमआर च्या एका जेष्ठ डॉक्टरांनी सांगितले आहे.  

सध्याच्या स्थितीत भारतात १९ हजारच्या जवळपास रुग्ण असून अडीच हजारांवर कोरोंनाचे रुग्ण बारे झाले आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये जेष्ठ नागरिकांचा जास्त समावेश असून मधुमेह, उच्च रक्तदाब ऋदयविकार असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. ‘यापूर्वी भारतात अनेक साथींच्या रोगाचा सामना केला आहे. भारतात मलेरियाचा सामना आपण करतोच यातून एक प्रतिकारशक्ति आपल्यामध्ये निर्माण होते त्याचाही फायदा होत असेल’ असे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले. भारतात रुग्णांची संख्या व उपलब्ध असलेली रुग्ण व्यवस्था ठीक असल्याचे दिसून येत आहे. भारतात कोरोनावर करण्यात येत असलेल्या उपचारांचा फायदा होत असून कोरोंनाचे भारतातील रुग्ण बरे होत आहे. यामुळे भारतातील ८३ टक्के कोरोनाबाधित रुग्ण बरे होईल असे तज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. 

… तर भारतात गुंतवणूक करणार चीनमधील एक हजार परदेशी कंपन्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *