…. म्हणून चीनी वस्तूंवर बहिष्कार वापरणे गरजेचे.

चीनमधील वुहाण शहरातून कोरोनाचा प्रसार संपूर्ण जगात झाला. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून चीनने कोणतीही दक्षता घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण जग चीनवर नाराज असून संपूर्ण जग चीनच्या या कृत्याचा रोष व्यक्त करत आहे. संपूर्ण जगाने चीनवर जगाने बहिष्कार घालून त्यांना चांगली अद्दल घडवायला हवी, अशी मागणी आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

जगाला कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका होऊ नये, चीनने याबाबत कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे चीनवर जगाने बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच जगावर कोरोनाचे संकट लादण्यास सर्वथा चीन जबाबदार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनवर बहिष्कार घातला पाहिजे, असेही आठवलेंनी म्हटले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आजवर संपूर्ण जगात ३ लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धानंतर आता कोरोनाचे तिसरे जागतिक महायुद्ध सुरु आहे. यात जगातील १९० देश भरडले जात असल्याचे आठवले म्हणाले.

चीनने संपूर्ण जगाला गाफिल ठेवले त्यामुळे संपूर्ण जगाने चीन विरुद्ध उभे राहण्याची गरज आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *