मोठी बातमी….! १४ तारखेपासून परवाना धारकांना मिळणार राज्यात घरपोच दारू.

राज्यातील मद्याप्रेमींना दिलासा देणारी बातमी आहे . लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता घरपोच दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील मद्य प्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या १४ तारखेपासून घरपोच दारूची सेवा चालू होणार असून त्यासाठी सरकारने काही अटी व शर्ती ठेवल्या आहे. परवाना असणाऱ्या मद्यप्रेमींना घरपोच दारू मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे दारु घेण्यासाठी वाइन शॉपमध्ये गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने घरपोच दारू विक्री करण्यास परवानगी दिली आहे.त्यामुळे आता ज्या वाइन शॉप धारकांकडे लायसेन्स आहे त्यांना आता घरपोच दारू पोहचवता येणार आहे.
डिलिव्हरी बॉयचा संबंध भरपूर लोकांशी येणार असल्यामुळे त्याची तपासणी करून त्याला डिलिव्हरी करण्यास जाता येणार आहे. तसेच त्याला आवश्यक असणारी पीपीई लाऊन सॅनिटराईझर लावूनच जावे लागणार आहे. तसेच प्रत्येक वाइन शॉप धारकाला केवळ त्याच्या हद्दीत असणाऱ्या परिसरातच दारू घरपोच विक्री करता येणार आहे. राज्याचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये सध्याच्या स्थितीत दारू विक्रीला परवानगी आहे तिथेच घरपोच दारू विक्री करता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार कडून जे कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहे त्या झोन मध्ये घरपोच दारू मिळणार नाही अशी माहिती देखील देण्यात आली आहे. तसेच ज्या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने दारू गर्दी टाळण्यासाठी बंद केली आहे तेथील निर्णय त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी निर्णय घेतील असेही मध्ये नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *