मोठी बातमी….! १२ मे पासून काही मर्यादित मार्गांनी धावणार रेल्वे.

कोरूना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लागला म्हणून घोषित करण्यात आला आणि त्याच बरोबर देशातल्या सर्व वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या. रेल्वे ही गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. पंरंतु आता १२ मे पासून मर्यादित रेल्वे मार्गांवर रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच उद्या संध्याकाळपासून या रेल्वे सेवांचं तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

बारा मी पासून काही मर्यादित रेल्वे मार्गावर रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. प्रवास करण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे थर्मास स्क्रिनिंग करण्यात येणार असून कोणतेही बाबतचे लक्षण आढळल्यास त्याला प्रवास करता येणार नाही आहे. प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क करणे बंधनकारक राहील. असं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. उद्या ४ वाजता पासून तिकीट बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. केवळ ऑनलाईन तिकीट बुकिंग होणार आहे. आणि केवळ तिकीट कन्फर्म असणाऱ्या लोकांनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार नाही. रेल्वे स्थानकावर कोणतीही बुकिंग होणार नसल्याचेही यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुढील मार्गावर चालणार रेल्वे

दिल्ली , मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू तावी, तिरुअनंतरपुरम, मडगाव, दिब्रुगढ, अगरताला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *