मोठी बातमी…! सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाचा संसर्ग.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून आता यामध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांचा देखील समावेश होत आहे. महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री व सध्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. महाराष्ट्र टाइम्स यांनी हे सदर वृत्त प्रकाशित केले असून अशोक चव्हाण यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्याची तयारी सुरू झाली आहे. याआधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते आता कोरोणामुक्त झाले आहे.

नांदेडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ही १२७ वर गेलीय. तसेच राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ५० हजारांच्या वर पोहचली आहे.  काल एका दिवशी राज्यात ३०४१ नवे रुग्ण मिळाले असून काल कोरोनामुळे ५८ जणांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *