मोठी बातमी…! मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती.

भारतासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे भारतातील रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असुन ते आता आशिया मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. त्यांनी जॅक माॅ यांना मागे पछाडत आशियातील सर्वात श्रीमंत होण्याचा मान पटकावला आहे.

नुकत्याच झालेल्या रिलायन्स जिओ आणि फेसबुक यांच्यातील करारामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याने त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत होण्याचा मान प्राप्त केला. ब्लूमबर्ग बिलेनियर च्या इंडेक्सनुसार मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवशी ३४ हजार कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे आता आशियातील श्रीमंत व्यक्तीचा मान आता भारतीयाकडे आला आहे. रिलायन्स जियो आणि फेसबुक यांच्यातील करारामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्स मध्ये १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रिलायन्स जिओ आता टॉप ५ कंपन्यांमध्ये समावेश झाला असून जिओ ने इन्फोसिस व एचडीएफसी लिमिटेड सारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे.

भारताने लॉकडाउन उठविण्यास घाई केल्यास होतील ‘हे’ परिणाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *