मोठी बातमी…! महाराष्ट्रातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढविण्यासाठी तयारी दर्शविल्याची व तशी केंद्राकडे मागणी केली असल्याचे वृत्त समोर येत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज लॉकडाउनचा आज अठरावा दिवस असून राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताच आहे.१४ एप्रिल रोजी हा लॉकडाऊन संपणार आहे. परंतु सध्याची देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली जात होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लॉकडाऊन वाढवण्याच्या मागणीला दुजोरा दिला. परंतु लॉकडाऊन संपूर्ण देशात वाढवला पाहिजे, एखाद्या राज्यातून लॉकडाऊन हटवणं आणि एखाद्या राज्यात उठवणं योग्य नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

सदर बैठकीला मुख्यमंत्री ‘वर्षा’ निवासस्थानाहून बैठकीला सहभागी होते. त्यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित आहेत.

दहावीचा पेपर रद्द होऊन सरासरी मार्क मिळणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *