मोठी बातमी….! देशातील लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढला.

देशातला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. १ जूनपासून ३० जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन ५.० हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध  टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात ८ जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्यानं सुरु होणार आहेत. ८ जूननंतर धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार असून ३० जूनपर्यंत रात्रीच्या वेळी कर्फ्यु लागू असणार आहे.

राज्यार्तंगत वाहतुकीवर बंदी नसणार आहे. मात्र वाहतूक नियंत्रित करण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असणार आहे.  या लॉकडाऊनचे “अनलॉक -१” असे नाव नामकरण करण्यात आले आहे. ग्रीन, रेड, ऑरेंज झोन रद्द करुन केवळ कंटेन्मेंट झोन असणार आहे. लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. यासाठी पासची आवश्यकता नसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *