मोठी बातमी…..! चीन सोबत झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद

भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातूनच चीनने आपल्या सवयी प्रमाणे भारता सोबत गद्दरी केली आहे. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत २० भारतीय जवान शहीद झाले असल्याची भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही ४३ जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत. या २० जवानांमध्ये कर्नल संतोष बापू, कुंदन ओझा, जवान पलानी यांना वीरमरण आले.

लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलची स्थिती चीन बदलण्याचा प्रयत्न करत होता, यातून हा सगळा संघर्ष झाला, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

भारत आणि चीनमध्ये ६ जून रोजी मेजर जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. ६ जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातूनच ही हिंसक चकमत झाली असल्याचे वृत्त एएनआय दिले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *