मोठी बातमी …! घरी परतणार्‍या मजुरांचा खर्च उचलणार कॉंग्रेस. सोनिया गांधी यांची मोठी घोषणा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मजुरांना आपल्या घरी पोहचविण्यासाठी सरकार कडून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. लॉकडाउन मध्ये अडकलेल्या बाहेर राज्यातील मजुरांना त्यांना घरी नेण्यासाठी रेल्वे कडून भाडे आकरण्यात आलं होतं. त्याच मुद्यावरून सरकार विरूद्ध विरोधी पक्षाने विविध प्रश्न उपस्थित केले होते. अशाच परिस्थितीत आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजूर व कामगारांचा प्रवासाचा खर्च कॉंग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले आहे.

कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरुण सदर माहिती देण्यात आली असून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने निर्णय घेतला घेतला आहे की राज्य कॉंग्रेसच्या प्रत्येक विभागान गरजू मजूर व कामगारांना घरी पाठविण्यात येण्यासाठी लागणारा खर्च उचलावा. व त्यांच्या तिकीटांसाठी खर्च करण्यासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलावी.  असे आदेश कॉंग्रेस तर्फे देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *