मोठी बातमी…! कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा.

सध्या संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने त्रस्त केले आहे. आता त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन व केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी पत्रकार परिषद घेऊन गरिबांसाठी १ लाख ७० हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणा केल्या आहे.
देशातील गरीब जनतेसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज
८० कोटी गरीब जनतेला ५ किलो राशन पुढील तीन महीने गहू, तांदूळ, मोफत देण्यात येणार.
मनरेगा अंतर्गत कामगारांना प्रतिदिन १८२ वरुण २०० रुपये
२० कोटी महिलांच्या जनधन खात्यात पुढील ३ महीने ५०० रुपये जमा करणार.
उज्वला योजनेद्वारे बीपीएल कुटुंबाला तीन महीने मोफत गॅस मिळणार.
गरीब, वृद्ध, दिव्यांग, विधवांना १ हजार रुपये देणार.
आरोग्य कर्मचार्यांदसाठी ५० लाखांचा आरोग्यविमा.
संघटित क्षेत्रातील नोकरदारांचा इपीएफ सरकार भरणार.
६३ लाख स्वयंसहायता समुहांना प्रत्येकी २० लाख रुपये मिळणार.
दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत ७ कोटी कुटुंबांना लाभ मिळणार.
प्रत्येक कामगाराला २ हजार रूपयांचा लाभ मिळणार.
८ कोटी ७० लाख शेतकर्यांजना किसान सन्मान योजनेतील पहिला हप्ता एप्रिलमध्ये देणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *