मोठी बातमी…! केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन.

शेतकर्‍यांसाठी  अत्यंत  महत्वाचे असलेल्या मान्सूनचे आगमन भारतात झाले असून आज मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहचले आहे. अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात भारतात ७५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज सकाळी मुंबईत पावसाने हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. त्याचबरोबर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात रविवारी रात्री अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने पुढील चार दिवस कोकणासह राज्याच्या बहुतांश भागाला पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार प्रामुख्याने कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस वादळी पाऊस होईल. पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसादरम्यान सोसाट्याचा वारा वाहणार आहे.

विदर्भामध्ये सुद्धा विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता  वर्तविण्यात आली आहे.

घरगुती गॅसच्या किंमती आजपासून वाढल्या, जाणून घ्या नवीन दर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *