मोठी बातमी ..! करोनावर औषध सापडल्याचा ‘चीनचा’ दावा.

संपूर्ण जगात ज्या करोनाने थैमान घातले आहे, करोना वायरसचा प्रादुर्भाव चीन मधूनच झाला होता. त्यामुळे चीन मध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. संपूर्ण जगाला करोंनाची धास्ती भरली असून देशांमधील व्यापार ठप्प झाले आहे, अशा त्या करोना वायरस वर रामबाण औषध सापडल्याचा दावा चीनने केला आहे चीनमधील चीनी सैन्याचे मेजर जनरलच्या टीमने हे औषध शोधले असल्याचा दावा चीन कडून करण्यात आला आहे. आणि लवकरच या औषधाचे वितरणही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काही वर्षापूर्वी सार्स आणि इबोलोसारख्या खतरनाक वायरस वर देखील याच मेजर जनरलच्या टीमने औषध शोधले होते. या औषधामुळे त्यांनी संपूर्ण जगाला मोठ्या संकटातून वाचविले होते. आता असा चमत्कार पुन्हा होईल अशा अशा पल्लवित झाल्या आहे. मेजर जनरलच्या टिमने दिवस रात्र मेहनत घेऊन या वायरसवर औषध शोधले असून लवकरच ही लस उपचारासाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती चीनने दिली आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *