मोठी बातमी..! उद्या लागणार इयत्ता १२विचा निकाल

महाराष्ट्र राज्याचे  बोर्डाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजे १६ जुलैला जाहीर होणार आहेत. दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in यावर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होईल.
कोरोणाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा पूर्ण होऊ शकली नव्हती. पण बारावीचे मात्र सगळे पेपर साथीच्या प्रादुर्भावाअगोदर आणि लॉकडाऊनपूर्वीच झाले होते. उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता निकाल कधी लागेल याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष होतं.
या वर्षी इयत्ता बारावीच्या १३ लाखहून अधिक तर दहावीच्या १७ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीचे निकाल उद्या तर दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती मिळत आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *