मोठी बातमी …! अभिनेता ऋषी कपूर यांचे निधन.

हिन्दी चित्रपट सृष्टीसाठी सलग दुसर्‍या दिवशीही मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर गेल्या एक आठवळयापासून रुग्णालयात उपचार घेत होते. ऋषी कपूर यांचे बंधु रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

“कॅन्सरच्या आजारातील गुंतागुंतीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते मागील एक आठवड्यापासून तिथेच आहेत. यावेळी उपचारादरम्यान त्यांना अनेक वेळा व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं,” अशी माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंह या त्यांच्यासोबत रुग्णालयात होत्या.ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून कॅन्सरचा इलाज करुन मुंबईत परतले होते. या उपचारादरम्यान ऋषी कपूर अमेरिकेतील रुग्णालयात 11 महिने आणि 11 दिवस होते. तिथून परतल्यानंतर उपचार यापुढेही सुरु राहतील आणि ठणठणीत बरं होण्यासाठी काही काळ लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं.

द बॉडी हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांनी आपल्या अभिनयातून चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी लवकरच चांगली बातमी येणार ?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *