मुलगा झाला म्हणून गावभर पेढे वाटणारा पिता निघाला कोरोनाबाधीत

मुलगा झाला म्हणून आनंदात पेढे वाटणार्‍या पित्याच्या आनंदात अवघ्या वेळातच विरजण पडले. कारण पेढे वाटणार्‍या पित्याला कोरोना झाल्याचे समोर आल्यावर पेढे खाणार्‍या तब्बल ११६ लोकांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे. सदर घटना नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील काटकळंबा गावात ही घटना घडली. तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने गावाची अक्षरशः झोप उडाली आहे.

प्रशासकीय यंत्रणेने आता खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील केला आहे. गावात आरोग्य कर्मचारी पथक, पोलीस, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यासह सामाजिक टीमचा राबता वाढला आहे. सदर तरुण हा औरंगाबाद येथील कंपनीत काम करतो. ४ जुलै रोजी मुलगा झाला म्हणून पाहण्यासाठी तो नांदेडमधील कंधार तालुक्यातील गावाकडे आला. आपल्या मुलाला पातंरड येथे भेटला आणि गावाकडे परतला. त्याच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ बहीण आहेत. दोन दिवसात तो गावातच आजोळी मामा-मामीलाही भेटला. मुलगा झाल्याच्या आनंदात त्याने गावात, मित्र मंडळीत पेढे वाटले.

त्याच्या संपर्कात आतापर्यंत ११६ जण आले असून त्या सर्वांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केलं आहे. न्हाव्याकडे संपर्क झाल्यामुळे नऊ जणांना कंधार येथे स्वॅबसाठी पाठवण्यात आलं आहे. रुग्णाच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचं काम तातडीने चालू केलं आहे. गावात भीतीचं वातावरण पसरु नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

Big Breaking देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांचा अपघात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *