मुनगंटीवारांचे सरकारला आव्हान ’३३ कोटी वृक्ष लागवडीच्या घोटाळ्याच्या आरोपाची चौकशी केली मागणी’ वनमंत्र्यांना लिहिले पत्र.

राज्याचे माझी वनमंत्री व भाजपचे मोठे नेते यांच्यावर महाविकास आघाडी सरकारन कडून ३३ कोटी वृक्ष लागवळीमध्ये घोटाला केल्याचा आरोप झाला व चौकशीची मागणी मागणीही काही नेत्याकडून करण्यात आली होती. आता या प्रकरणावर स्वतः मुनगंटीवारांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्यांच्या मनात वृक्ष लागवळीबद्दल शंका आहे अशा शंकाखोरांच्या मनातून शंका दूर करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

        युती सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाढत्या वसुंदरेच्या –हासा मुळे व सततच्या वृक्षांच्या प्रमाणात होणार्‍या घटीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हातात घेतला. या कार्यक्रमात सरकारच्या विविध संस्थांना सहभागी करून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.

   ३३ कोटी वृक्ष लागवडीचं करी हे ईश्वरी व पर्यावरणाचे कार्य असून या कार्यक्रमाचे संपूर्ण पुरावे फोटो सर्व उपलब्ध असून नागपूरच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षात संपूर्ण आकडेवारी उपलब्ध असून ते सरकारने मागून घ्यावी असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले. त्याच बरोबर वन विभागाद्वारे केलेल्या वृक्ष लागवळीच्या उपक्रमातून राज्यातील वन क्षेत्रात वाढ झाली असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवारांनी लिहिले वनमंत्र्यांना पत्र  

माझी वन व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्र्यांना पत्र लिहली असून त्यामध्ये आपण कोणत्याही चौकशीला समोर जाण्यास तयार असल्यांचे त्यांनी नमूद केले असून आपण केलेले कार्य हे ईश्वरी व पर्यावरणाचे कार्य आहे. आपण मा. उच्च न्यायलायाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी व चौकशीचा अहवाल वेगाने सादर करावा असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *