मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी यासाठी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे दोन वेळा शिफारस केली होती. मात्र, राज्यपालांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. या मुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत चालले होते. यात तीन आठवड्यांचा काळ निघून गेला. राज्यपालांकडून काहीही प्रतिसाद येत नसल्याचे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि या वर तोडगा काढावा अशी विनंती केली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या बैठकीत निवडणुकीला परवानगी देण्यात आली आणि राज्यातील पेच सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.

आता महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताwjना आयोगाने करोनाबाबत काळजी घेण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकी संदर्भातला राजकीय पेच आता संपुष्टात येणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ मेपूर्वी विधान परिषद निवडणूक घेण्याच्या सूचना केल्या आहेत. याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांना २७ मे पूर्वी कोणत्यातरी एका सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे आहे. या निर्णयानुसार आता २७ मेपूर्वी या निवडणूका पार पडतील असे म्हटले जात आहे. मात्र, ही निवडणूक घेत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरनाबाबतच्या इतर सगळी काळजी घेणे बंधनकारक असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *