मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.

कोरोंनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात पर राज्यातील कामगार आपल्या राज्यात परत गेले असून याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नोकर्‍यांची संधी राज्यातील तरुणांपर्यंत पोहचविण्याकरिता महाराष्ट्र सरकार कडून महाजॉब्स हे पोर्टल चालू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पोर्टलचं आज उद्घाटन करण्यात आलं.

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार केले गेले आहे. नोकरी शोधणा-या कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा महाजॉब्स पोर्टल हेतु आहे.

या पोर्टल द्वारे नोकरी शोधणारे कामगार व उद्योजक यांच्यातील अंतर कमी होणार असून यामध्ये नोकरी पाहिजे असणारे व नोकरी देण्यारे उद्योजक या दोघांना पण नोंदणी करता येणार आहे. यामुळे उद्योजकांना कुशल कामगार मिळून त्याचे काम पार पडण्यास मदत होणार असून कुशल कामगारांना देखील त्यांच्याकडे असलेल्या कौशल्या संबंधी कामगार मिळण्यास मदत होणार आहे.

कशी करायची महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी 

महाजॉब्स पोर्टलवर कामगारांना व उद्योजकांना नोंदणी करण्यासाठी वेगवेगळी सोय केलेली आहे. कामगारांना नोंद करण्यासाठी सर्वप्रथम mahajobs.maharashtra.gov.in या साइट वर जावे लागणार. त्यानंतर नोकरी शोधक नोंदणी या सर्च बटन वर क्लिक करावे. त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये कामगाराला आपले नाव मोबाइल नंबर व ई-मेल टाकून त्याची पडताळणी करावी लागणार. पडताळणी झाल्यानंतर आपला पासवर्ड टाकून आपल्या फॉर्मला सबमीट करावे. उद्योजकांना देखील आपल्या कंपनीचे नाव टाकून आपल्या कंपनीचा ई-मेल व फोन नंबर टाकून त्याची पडताळणी करावी लागणार आहे.

One Comment on “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.”

  1. चांदा ते बांधा वेब पोर्टल कायम उपयुक्त माहिती बातमी सांगते धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *