मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्च ला जाणार अयोध्या. शिवसैनिकासह घेणार ‘श्रीराम दर्शन’

राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहे. येणार्‍या  ७ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकासह अयोध्येला जाणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे.
७ मार्च रोजी उद्धव ठाकरे आपल्या असंख्य शिवसैनिकासह अयोध्येला जाणार असून त्यांच्या समवेत श्रीराम दर्शन घेणार आहे. त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील, त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यात सामील व्हा. असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सह पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,व कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर आता लगेच ट्विट करून राऊत यांनी भाजपला धक्का दिला असल्याचं बोलल जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौर्‍याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे. कालचं शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मधून राम मंदिर मुद्द्यावरून भाजपला कानपिचक्या दिल्या होत्या आता त्याच पार्श्वभूमीवर अचानक अयोध्या जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेची या  दौर्‍यामागची काय भूमिका आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

नितिन गडकरींना चक्क ‘सर्वोच्च’ न्यायालयाकडून निमंत्रण….!

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *