मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ उमेदवारांनी घेतली विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ.

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषद सदस्याची शपथ घेतली असून नऊ उमेदवारांनी शपथ घेतली. आज उद्धव ठाकरे सह नऊ उमेदवारांचा शपथविधी आज विधानभवनात पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळचे सदस्य झाल्याने महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकीय संकटावर पडदा पडला आहे. शपथविधीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

विधानभवनात झालेल्या शपतविधी सोहळ्यात भारतीय जनता पक्षाकडून रंजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दडके, रमेश कराड यांनी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली, शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह निलम गोर्हेर, राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, व कॉंग्रेस कडून राजेश राठोड यांनी विधानपरिषदेची शपथ घेतली. 

चीनमधून बाहेर पडणार्‍या कंपन्यांसाठी महाराष्ट्र सज्ज. :- उद्योगमंत्री सुभाष देसाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *