मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का, महत्वाचा खेळाडू दुखापतीने ग्रस्त.

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या संघातील एक महत्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे आणि त्याने एका स्पर्धेतून माघार घेतल्याचे दिसत आहे.मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू कायरन पोलार्ड हा सध्या दुखापतीमुळे बेजार झाला आहे. त्यामुळेच त्याने पाकिस्तान प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

करोना वायरसने सावट सध्याच्या घडीला जगभरात पसरले आहे. त्यामुळे या गोष्टीचा फटका आता भारतामधील गर्भश्रीमंत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगलाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना वायरसमुळे यंदाची आयपीएल पुढे ढकलली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.भारतामध्ये सध्या ‘करोना’चा थोड्या प्रमाणात प्रदुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतामध्ये सध्याच्या घडीला करोना वायरसचे ४२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेली आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार सुरु आहे. करोना वायरस रोखण्यासाठी आता आयपीएल एक वेगळीच शक्कल लढवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ही शक्कल जर यशस्वी ठरली तर आयपीएल सुनियोजित वेळेत होऊ शकते, असे आयपीएलच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.

बँक ऑफ इंडिया, वर्धा भरती २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *