मुंबईत तरुणाचा पोलिसांवर कोयत्याने हल्ला, दोन पोलीस जखमी.

एकीकडे पोलीस कोरोनाच्या पार्श्व भूमीवर आपले कर्तव्य पार पडण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहे. त्यातच पोलिसांवर होणारे हल्ले आता पुन्हा वाढत आहे. अशीच घटना मुंबईमधील मरीन ड्राईव्ह भागात घडली. नाकाबंदी असणार्‍या दोन पोलिसांना एका तरुणाने कोयत्याने हल्ला केला. मरिन ड्राईव्हवर रात्री अकरा वाजता झालेल्या या हल्ल्यात पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस उपनिरीक्षक शेळके जखमी झाले असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. रात्री फिरत असताना पोलिसांनी केवळ हटकलं म्हणून त्याने कोयत्याने हल्ला केल्याचं समजतं.

काही पोलिस त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते परंतु तरुण काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी पोलिसांनी त्याला दोरी आणि लाठीच्या सहाय्याने अटक करावी लागली. हा तरुण कुलाबा परिसरातील आहे. शुक्रवारी रात्री तरुण रस्त्यावर फिरत असताना नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी त्याला हटकलं. यानंतर तरुणाने बॅगमधून कोयता काढला. कोयता तुमच्या डोक्यात मारुन गंभीर इजा करेन अशी धमकी त्याने पोलिसांना दिली आणि तिथून पळ काढला. त्याला पकडतांना त्याने कोयत्याने हल्ला केल्याने दोन पोलीस जखमी झाले. आता पोलिसांना हा तरुण कोयता बॅगेमध्ये घेऊन कुठे चालला होता. याला कोणाला मारायचे होते काय या गोष्टीचा शोध घेत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *