महासत्ता अमेरिकेला हवी भारताची मदत, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध पुरवीण्याची केली विनंती.

संपूर्ण जगात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातली आहे. कोरोना संसर्ग असणार्‍यांचा आकडा दिवसेनदिवस वाढता आहे. सध्या संपूर्ण जगात १२ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत आहे. त्यातच अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता महासत्ता असणार्‍या  अमेरिकेला भारताच्या मदतीची गरज पडली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता अमेरिकेने भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी केली आहे.  गेल्या महिन्यात भारताने औषधांच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधी अमेरिकेला द्यावी अशी विनंती नरेंद्र मोदींना केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रंप यांनी माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन तयार होते. भारताच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने 25 मार्च रोजी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परंतु भारतावर अमेरिकेच्या विनंतीला मान देवून औषध पुरवण्याचे मान्य केले आहे. त्याच बरोबर भारताने हे औषध तयार करणाऱ्या सर्व कंपन्यांना भारत सरकारने औषधांचं उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना एकही गोळी स्थानिक पातळीवर खरेदी करू नका. आम्ही तुम्हाला मुबलक पुरवठा करतोय असे गुरूवारीच कळवले आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत ८४५२ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेसह जगभरातील शास्त्रज्ञ या विषाणूची लस किंवा उपचारात्मक उपचार शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही प्रारंभिक निकालांच्या आधारे, ट्रम्प प्रशासन कोरोनाव्हायरसच्या यशस्वी उपचारांसाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन नावाच्या जुन्या मलेरिया औषधाचा वापर करण्यास अनुकूल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *