महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पातील संपूर्ण तरतुदी व संपूर्ण मुद्दे थोडक्यात.

महाविकास आघाडीचा आज पहिला वहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.

मित्रपक्षांच्या लोकाभिमुख सरकारचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली म्हणून अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानलेत. देशात कसोटीचा काळ आहे, आर्थिक मंदीच्या सावटामुळे देशाला गंभीर परिणामांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे आर्थिक गती, रोजगार निर्मिती याचा आलेख उतरता असल्याचं अजित पवार म्हणालेत. राज्यातील सर्व घटकांचा विकास, तरुणांना रोजगार, आरोग्य सेवा हा संकल्प डोळ्यासमोर अजित पवार यांनी आजचा अर्थसंकल्प सादर केला.

हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेने अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची सुरवात केली.

केंद्राकडून जीएसटी परतावा मिळण्यास उशीर होतोय त्यामुळे राज्यातील विकास कामं करायला अडचण येतेय. अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्याचं आव्हान स्वीकारत पुढील वाटचाल करावी लागणार असल्याचं अजित पवार म्हणालेत

 • महाराष्ट्रात महात्मा फुले कर्जमाफी योजना सरकारने राबवली 
 • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जातोय होतोय 
 • 190-20 मध्ये कर्जमाफीसाठी रुपये 15 हजार कोटींची तरतूद केली होती, यंदा यामध्ये आणखी 7 हजार कोटींची तरदूद करून एकूण 22 हजार कोटींची कर्जमाफी आम्ही देणार आहोत  आतापर्यंत 9 हजार 35 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा उर्वरित रक्कम खरीपपूर्वी जमा करण्यात येईल 
 • नियमित रक्कम भरणाऱ्यांसाठी 50 हजारांचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल 
 • राज्यात जलसंधारणाची कामं झालीत मात्र देखभाल न केल्याने पाणीसाठा राहिला नाही यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबवणार 
 • वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या शेतीच्या नुकसानाची विम्यान भरपाई मिळावी यासाठी काही विमा कंपन्यांशी चर्चा करणार 
 • शेती पंपासाठी नवीन जोडणी देणं चालू करणार
 • कृषी ,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायासाठी 3224 कोटी रुपयांची तरतूद  
 • मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना सुरू करणार
 • राज्यातील 313 अपूर्ण असे सिंचन प्रकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न 
 • ठिबकवर जास्त सवलत दिली जाणार, येत्या काळात ऊसाची संपूर्ण शेती ठिबक खाली आणणार.
 • शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी 10 हजार कोटींची योजना सुरू करणार
 • नागरी विकासासाठी मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांसाठी नागरी सडक योजना राबवणार
 • ग्रामीण सडक योजना सुरू करत आहोत, 80 हजार किलोमीटर रस्त्यांची कामं करणार
 • भंडाऱ्यात नवीन कृषी विद्यापीठ बनवण्यात येणार 
 •  रेशीम शेतीसाठी आणि त्याच्या मशिनरीसाठी अनुदान देणार  
 • पुणे मेट्रोसाठी मागील पाच वर्षात जो निधी दिला त्याच्या पेक्षा जास्त निधी यंदा देणार
 • सोलापूर आणि पुण्यात नवीन विमानतळ उभारणार
 • कर्नाटक राज्यातील मराठी वर्तमानपत्रांना जाहिरात देण्यात येईल
 • उच्च व शिक्षण विभागासाठी 1300 कोटी वाढणव्यात आले आहेत
 • मुंबईत मराठी भाषा भवन बांधणार
 • राष्ट्रीय पेयजल योजना ही जलजीवन योजना म्हणहून सूरु करणार
 • प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलिस स्टेशन उभारणार
 •  मागील वर्षात 50 लाख वृक्ष लागवडीचा दावा करण्यात आला आहे, त्याची देखभाल केली जाईल
 • पुणे येथे नोकरी करणाऱ्या 1000 महिलांसाठी वसतिगृह सुरू करणार
 • आरोग्याच्या 187 इमारतींची बांधकामं रखडलेली आहेत. ती कामं पूर्ण करणार
 • प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी चार शाळा आदर्श शाळा बनवणार, राज्यात 1500 आदर्श शाळा तयार करणार
 • मराठी नाट्य संमेलनासाठी 10 कोटी रुपये 
 • वरळीतील डेरीच्या जागेवर आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुलन उभारणार
 • प्रत्येक शाळेत मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल जाईल
 • एसटीच्या 1600 जुन्या बस बदलणार
 • ग्रामीण भागात बसमध्ये वायफाय सुरू करणार
 • नवी मुंबईतील वाशीमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार
 • पुण्यात ऑलम्पिक भवन बनवणार
 • ठाण्यात हज हाऊस बांधणार
 • पेट्रोल-डिझेल वरती 1 रुपया अतिरिक्त कर वाढवला
 • मिनी ऑलम्पिक महाराष्ट्रात स्पर्धा सुरु करणार 
 •  ​तृतीयपंथी यासाठी मंडळ स्थापन 5 कोटी रुपये देनार
 • गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासह विविध स्मारकांसाठी निधी, धार्मिक स्थळांच्या विकासासाठीही निधीची तरतूद
 • औद्योगिक वापरातील वीज दरातही कपातीची घोषणा
 • पुण्यात बालेवाडी म्हाळुंगे मध्ये आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यालय उभारणार
 • मंदीमुळे राज्यातील उद्योग अडचणीत आहेत, उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काही सवलती राज्य सरकार देणार 
 • आमदारांना मतदारसंघात विकासकामे करायची असतात. त्यासाठी आमदार निधी दोन कोटीवरुन तीन कोटी रुपये करण्यात आला आहे.
 • क्रीडा संकुलासाठी भरीव तरतूद, राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडा संकुलासाठी रूपये २५ कोटी इतका निधी देण्यात येणार आहे. हा निधी यापूर्वी केवळ ८ कोटींचा होता. त्यात वाढ करण्यात आली आहे.
 • शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळत नाही अशी तक्रार होती. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात शेतकऱ्यांना ५ लाख सौरपंप बसवून देण्यात येतील. वर्षाला एक लाख पंप बसवण्याचे उद्दिष्टय आहे. ६७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
 • आरोग्यासाठी ५ हजार कोटी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
 • गाव तिथे एसटी यासाठी १६०० नव्या एसटी बस विकत घेण्यासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येईल. बस स्थानकांसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
 •  दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना आणण्यात येईल. २१ ते २८ वयोगाटतील तरुण-तरुणींसाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.
 • महाराष्ट्रातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
 • मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये बांधकाम उदयोगाला चालना देण्यासाठी पुढच्या दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्के सवलत देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *