महाराष्ट्रासाठी दिलासा…..! एका दिवशी ५८७ रुग्ण कोरोनामुक्त.

देशातील व राज्यातील कोरोनाचे रुग्ण दिवसेनदिवस वाढत असले तरी कोरोनापासून मुक्त होणार्‍यांची संख्या देखील वाढत आहे. काल राज्यातील एकाच दिवशी ५८७ रुग्ण कोरोंनावर मत करून घरी परतले आहे. यामध्ये ठाणे २०९, पुणे १६१, मुंबई ५५, रायगड ५३, औरंगाबाद ४३, रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आता महाराष्ट्रातील बरे झालेल्या ऋगांची संख्या पाच हजारावर पोहचली आहे.

जागतिक परिचारिका दिनानिमित्य ५८७ रुग्ण बरे हो घरी परतल्याने ही राज्याला भेट असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले “ डॉक्टरांच्या उपचारला व रुग्णाच्या इच्छाशक्तीला यशस्वी करण्यासाठी परिचारिका महत्वाचा दुवा ठरत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून परिचारिका आपले कर्तव्य बजावत आहे.” असे त्यांनी म्हटले.    राज्यात आज कोरोनाच्या तब्बल १०२६  नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २४४२७ असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी २८  जण मुंबईचे तर पुण्यातील ६, पनवेल ६, जळगाव ५, सोलापूर ३, ठाणे 2, औरंगाबाद, रायगड आणि अकोला शहरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ९२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *