महाराष्ट्रासाठी दिलासा ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त.

देशातील व राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारे बाब समोर आली ती म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा जिल्हा आता कोरोणामुक्त झाला आहे. बुलढाण्यातील तिन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून कोरोना बाधितांची संख्या आता शून्यावर आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात एकूण २४ बाधित रुग्ण होते. त्यापैकी एकाचा २८ मार्चला मृत्यू झाला होता. पश्चिम विदर्भातील हा पहिला करोना मृत्यू ठरला होता. त्यानंतर गेल्या ४० ते ४५ दिवसांत बाधितांची संख्या २४ वर पोहोचली होती. मात्र, आरोग्य प्रशासनानं तातडीनं त्यांच्यावर उपचार सुरू केले होते. त्यामुळं याआधीच २० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ११ जण बुलडाण्यात अडकले होते. त्यातील तीन जण हे करोनाबाधित आढळून आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनाही आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील कोरोना बाधीतांची संख्या साठ हजारांवर गेली असून महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या वीस हजारांच्या वर गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *