महाराष्ट्रासमोर गंभीर आर्थिक संकट, महाराष्ट्राला २५ हजार कोटींच पॅकेज देण्याची केंद्राकडे मागणी.

सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे संपूर्ण उत्पन्न बंद झाले असून याचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर पडत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. यामुळे सरकारच्या उत्पन्नाला देखील खूप मोठ फटका बसत आहे. त्यामुळे राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असून उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी या परिस्थिती कडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढतच असून राज्यसरकार कडून कडक निर्णय घेतले जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक उद्योग बंद करण्यात आल्यामुळे उद्योग क्षेत्राला झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे राज्यसरकारच्या तिजोरीला फटका बसत आहे. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
तसेच केंद्रसरकार कडून राज्याला येणारी करातील रक्कम देखील ३१ मार्च पर्यन्त देण्यात यावी अशीही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री यांच्या सोबतच राज्यातील केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व प्रकाश जावडेकर यांना देखील पत्र दिले आहे.

किर्गिस्तानमध्ये अडकले महाराष्ट्रातील २०३ विद्यार्थी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *