महाराष्ट्रात २३४५ नवीन रुग्ण तर १४०८ रुग्णांची कोरोनावर मात.

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेनदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा चाळीस हजारावर पोहचला आहे. राज्यात गुरुवारी २३४५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यात आज १४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल दिवसभरात ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

देशात काल एका दिवशी ५६०७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून देशातील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख १५ हजारांवर पोहचली आहे. ४६ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ६३६२४ रुग्ण सध्या उपचार घेत आहे. तर संपूर्ण देशात आतापर्यंत ३५०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर देशांपेक्षा अधिक आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *