महाराष्ट्रात विविध कंपन्या करणार १६ हजार कोटींचा गुंतवणूक.

कोरोनाच्या संकटात संपूर्ण महाराष्ट्र लढत आहे. तरी अशा कठीण परिस्थितीत देखील महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कंपन्या पुढे आल्या आहे. काल राज्यसरकारने विविध कंपन्यांसोबत १६ हजार कोटींचा सामंजस्य करार केला आहे. राज्यात इतकी कठीण परिस्थिती असताना आपण महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करू. हे आणि यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  या प्रसंगी राज्य उद्योग विभागातर्फे मग्नेटिक महाराष्ट्र २.० चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणूकदारांसोबत हे करार करण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री यांच्या उपस्थित व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार, उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते.

इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यात परकीय गुंतवणूक वाढ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या व मिळणारा रोजगार

ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे ३७७० कोटी आणि २०४२

रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे १५०० कोटी

युपीएल( भारत) केमिकल- शहापूर, रायगड ५००० कोटी आणि रोजगार ३०००

इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड १५०० कोटी आणि रोजगार २५००

पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो-तळेगाव १००० कोटी रोजगार १५००

इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन – रांजणगाव, पुणे १२० कोटी आणि ११०० रोजगार

असेट्ज (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे ११०० कोटी आणि २०० रोजगार

हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव १५० कोटी आणि २५०० रोजगार

एक्सॉन मोबिल (अमेरिका)ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड ७६० कोटी

हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक – २, पुणे २५० कोटी आणि १५० रोजगार

असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे ५६० कोटी

वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर ८२० कोटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *