महाराष्ट्रातील राज्यसभेचे सातही उमेदवार बिनविरोध.

राज्यात राज्यसभेच्या सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. याबाबतची घोषणा मतदान नोंदणी अधिकार्यांननी केली. अर्ज मागे घ्यायची तारीख १८ मार्च होती मात्र सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने उमेदवारांच्या विजयाची औपचारिक घोषणा करणे बाकी होते. राज्यातून भाजपातर्फे उदयनराजे भोसले, रामदास आठवले, भागवत कराड, शिवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे शरद पवार, फौजिया खान, व कॉंग्रेस तर्फे राजीव सातव यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली आहे.
देशातील सतरा राज्यातील ५५ सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार असून महाराष्ट्रातील सात सदस्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे ४ तर भाजपचे ३ उमेदवार निवडून येण्याची शक्यता होती. मात्र अर्ज जास्त न आल्याने तेवढेच संख्याबळ निवडून आले.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *