महाराष्ट्रातील कोरोना चाचण्यांना येणार गती.

महाराष्ट्रात सध्याच्या स्थितीत देशामध्ये सर्वात जास्त कोरोंनाबाधितांची संख्या आहे. मुंबई, पुणे, नागपुर अशा मोठ्या महानगरांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे आता कोरोना चाचण्यांना गती देण्यासाठी आता रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. केंद्र सरकार कडून काही निकष लाऊन रॅपिड टेस्ट घेण्यास मान्यता दिली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ७५ हजार रॅपिड टेस्ट करण्यात येणार असून मुंबईमध्ये काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील कोरोना रुग्णालयांत ऑक्सिजन स्टेशन करण्यात भर देण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबूक लाईव्ह द्वारे संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना रुग्ण वाढण्याचा वेग कमी झाला असून आता संख्या दुप्पट होण्यास ७ ते ८ दिवसांचा कालावधी घेत असल्याचे सांगितले. मुंबईमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीनमुळे प्रतिबंधात्मक शक्ति वाढते त्यामुळे मुंबईमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या वाटप करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु ६० वर्षावरील व १५ वर्षाखालील व्यक्तींना या गोळ्या देण्यात येणार नाही. असेही यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

पत्रकार बंधुंनो तुम्हींही स्वतःची काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *