महाराष्ट्रातील कोरोनारुग्णांचा आकडा ५० हजारांच्या पलीकडे.

देशासह राज्यात कोरोनाबाधितांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. काल एका दिवशी राज्यात नवीन ३ हजार ४१ रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ५० हजारांपलीकडे गेला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी काल दिवसभरात ११९६ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १४६०० वर पोहचली आहे. सध्या राज्यात ३३९८८ कोरोंनाचे अॅक्टिव रुग्ण आहे.

आज दिवसभरत कोरोनामुळे ५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता १६३५ पोहचली आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी मुंबईत ३९, पुण्यात ६ , सोलापूरात ६ , औरंगाबादमध्ये ४ , लातूरमध्ये १, मीरा-भाईंदरमध्ये १ , ठाण्यात १  मृत्यू झाला आहे. सध्या संपूर्ण राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोक होम क्वारंटाईन मध्ये आहे.

येत्या १५ जूनपर्यंत शाळा चालू होण्याची शक्यता. : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *