मराठी पाऊल पडते पुढे, सोलापूरचे झेडपी शिक्षक जगातील सर्व्वोत्तम शिक्षकांच्या यादीत.

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्लोबल टीचर प्राइजची नुकतीच घोषणा झाली असून यामध्ये जगातील सर्व्वोत्तम ५० शिक्षकांचा निवळ करण्यात आली आहे. आणि त्यात आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील रणजीतसिंह डिसले यांना हा बहुमान देण्यात आला आहे. असा बहुमान प्राप्त करणारे डिसले हे एकमेव भारतीय ठरले आहे. वाकी फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणार्याए या पुरस्कारात १० लाख अमेरिकन डॉलर सोबत हा पुरस्कार देण्यात येतो
रणजीतसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परतेवाडी शाळेत मागील ११ वर्षापासून कार्यरत आहे. डिसले सर हे त्यांच्या तंत्रज्ञांनातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. जगभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना ते ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे मार्गदर्शन करत असतात. त्यांनी तयार केलेली QR कोटेड पुस्तके जगातील ११ देशांतील १० कोटीहून अधिक मुले वापरतात. मायक्रोसॉफ्ट , नॅशनल गिओग्राफीक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजीतसिंह डिसले यांचा गौरव केला आहे.
लेट्स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्राइल, पलेस्टाइन, अमेरिका, उत्तर कोरिया, या जगातील सर्वात अशांत देशातील ५००० मुलांची पीस आर्मी तयार करून परस्पर सोहार्दाचे वातावरण करण्याच्या या प्रयोगासाठी त्यांची निवळ करण्यात आली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातून शांतता निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न प्रेरणादायी आहे, अशा शब्दात निवळ समितीने त्यांचा गौरव केला. या पुरस्करामुळे रणजीतसिंह डिसले यांनी आपल्या देशाचे नाव लौकित केले असून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अखेर निर्भया प्रकरणातील आरोपी अडकले फासावर.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *