मराठी पाऊल पडते पुढे….! महाराष्ट्राच्या डॉ. माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल पडी निवड.

महाराष्ट्राच्या कन्या डॉ. माधुरी कानिटकर यांना मेजर जनरल पदावरून लेफ्टनंट जनरल पदी बढती देण्यात आली आहे. डॉ. माधुरी कानिटकर यांची गेल्या वर्षीच जनरल पदी निवड झाली होती. जागा रिक्त झाल्यानंतर काल (शनिवारी) त्यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मनाचा तूरा लागला आहे. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या तर देशातील तिसर्याी महिला ठरल्या आहे.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्णयामुळे तळप्रमुखसारख्या नेतृत्वपदी महिलांची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या निर्णयाचा महिला लष्करी अधिकार्यांपनी स्वागत केले आहे. लष्करात महिला पुरुष असा भेदभाव होऊ नये असे सर्वोच न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
डॉ. माधुरी कानिटकर यांचे पतीसुद्धा लष्करातील अधिकारी होते ते नुकतेच लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झाले आहे. एखाद्या दांपत्याने लष्करात  लेफ्टनंट जनरल पद भूषविले अशी ही पहिलीच घटना आहे. डॉ. माधुरी कानिटकर यांनी आपली पदवी एमबीबीएस मधून १९८० मध्ये घेतली असून त्यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे व तेथे शिकत असतांना त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक मिळाले होते. त्याच बरोबर डॉ. माधुरी कानिटकर ह्या पुण्यातील लष्करी महाविद्यालयाच्या पहिल्या अधिष्ठाता होत्या. 

रश्मी ठाकरे आता ‘सामना’ च्या नव्या संपादक.

 
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूकटेलीग्राम ग्रुप वर जाईन व्हा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *