मराठी तरुणांनो रोजगार मिळविण्याची “हीच ती वेळ”

चीनच्या वुहाण शहरातून कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगत पसरला . कोरोना वायरसच्या प्रादुर्भावणे संपूर्ण जग ठप्प झाले. कधी बंद न होणारी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाली. अनेक देशांनी ताळेबंधी घोषित केली. जगातील असंख्य लोकं जेथे होते तिथेच अडकले.  अनेक लोकांना या काळात असंख्य संकटांना सामोरे जावे लागले. भारतात तर स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे स्थलांतर झाले. लॉकडाउनमुळे हातातील रोजगार गेल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. पर्यायी अनेक लोकांनी आपल्या राज्यात आपल्या गावाकडे स्थलांतर करण्यास सुरवात केली. अनेक लोकांनी पायदळ चालून आपले गाव गाठले. तरी काही लोकांचे स्थलांतर करतांना प्राण गेले. त्यामुळे आता जवळपास अनेक लोकं आपल्या गावी गेले आहे. कोरोंनाची भीती आणि पोटाची भाकर यासाठी अनेकांना आपले गाव गाठावे लागले.

त्यामुळे आता लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. त्यामुळे देशातील बंद असलेले उद्योग आता हळूहळू चालू होत आहे. त्यामुळे आजपर्यन्त बेरोजगार असलेल्या मराठी तरुणांना रोजगार मिळविण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. यासाठी सरकार कडून देखील प्रयत्न करण्यास सुरवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे. त्यामुळे कोरोंनाचे संकट आता मोठी संधी घेऊन आले आहे.

चीनमधील वुहाण शहरातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने यूरोपियन कंपन्यांचा चीनकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. त्या कंपन्यांना आपली चीनमधील गुंतवणूक काढून दुसर्‍या आशियाई देशांत करायची आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारने प्रयत्न केल्यास महाराष्ट्रात नवीन उद्योग येऊ शकते व त्या माध्यमातून नवीन रोजगार प्राप्त होऊ शकतो. मराठी तरूणांकडे हीच ती वेळ आहे नवीन रोजगार मिळविण्याची कारण परराज्यातील अनेक कामगार आपल्या राज्यात परतले आहे. त्यामुळे उद्योग चालू करण्यासाठी कामगारांची आवश्यकता आहे व मराठी तरुणांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते.  त्यामुळे मराठी तरुणांनो येणार्‍या संधीसाठी तयार व्हा आणि येणार्‍या संधीचा फायदा घ्या. स्वताला बेरोजगार होण्यापासून वाचविण्याची व रोजगार मिळविण्याची हीच ती वेळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *