मनसेच्या आमदाराने केलं कोरोना ग्रस्थांसाठी लाखमोलाच काम.

देशात कोरोनाच्या लढ्यात अनेक जण सहभागी झाले आहे. काही लोक सेवा करून लढ्यात सहभागी झाले आहेत तर काही लोक आपल्याकडे असणारी संपत्ती मदतीसाठी देऊन देशावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी पुढे येत आहे. सध्या प्रत्येक व्यक्ती आपल्यापरीने जेवढी मदत करता येईल तेवढी करतांना दिसून येत आहे.

अशीच मदत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी कोरोनाग्रस्थांसाठी केलेल्या आगळ्यावेगळ्या मदतीची सर्वत्र चर्चा होत आहे. आमदार राजू पाटील यांनी स्वतःच्या मालकीचे असलेलं अख्ख रुग्णालय कोरोनाच्या उपचारांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. राज्यातील कोरोना बधितांची संख्या वाढतच आहे. मुंबई व आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आमदार राजू पाटील यांनी महानगरपालिकेशी संपर्क साधून आपले डोंबवली येथील आर आर रुग्णालय कोरोनाच्या रुग्णाच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. मनसे आमदार राजू पाटील यांनी ही माहिती स्वतः ट्विट करून दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *