मनसेची नवीन योजना, ‘ घुसखोरांची माहिती द्या आणि बक्षीस मिळवा ’

राज ठाकरे यांनी बांगलादेशी व पाकिस्तानी विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर आता मनसे सैनीकांनी चांगलीच कंबर कसली आहे. पहिले मनसे कार्यकर्त्यांनी स्वत: बांगलादेशी घुसखोरांना पकडले आणि घुसखोरांना पकडण्यासाठी नवीनच शक्कल लढवली आहे. खुसखोरांना पकडा आणि पाच हजार मिळवा अशी नवीन योजना औरंगाबाद मनसे कडून जाहीर करण्यात आलं आहे.

राज ठाकरे बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर हाकलण्यासाठी सतत आपल्या मधून सांगत असतात. परंतु यावर कुठलीही कारवाही प्रशासनाकडून घेण्यात आली नाही त्यामुळे आता मनसे सैनिक स्वत: याकडे लक्ष देत आहे. औरंगाबाद येथील आकाशवाणी चौकात एक स्टॉल सुरू केला आहे. या स्टॉल वर घुसखोरांची माहिती गुप्तपणे द्यायची आणि पाच हजार रुपये बक्षीस मिळवायचे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. या योजनेमुळे औरंगाबादमध्ये जोरदार चर्चा आहे.

भारतीय महिला संघाचा ‘हॅट्रिक’ सह उपांत्य फेरीत प्रवेश.


महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *