मध्यप्रदेशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मोठा राजकीय भूकंप होणार ?

मध्यप्रदेशातील कॉंग्रेस पक्षाचे मोठे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सोबत त्यांच्या समर्थक असलेल्या २२ आमदारांनी देखील राजीनामे दिले असून त्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपामध्ये घरवापसी केली आहे.मध्यप्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद महाराष्ट्रातही पडण्याची चर्चा चालू झाली आहे महाराष्ट्रातील कॉंग्रेसवर नाराज असलेले मोठे नेते मिलिंद देवरा देखील कॉंग्रेसला रामराम ठोकतील अशा चर्चांना उधाण आले आहे.

मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे अतिशय विश्वासू असून राहुल गांधी यांच्या सोबत अनेक परदेशी दौर्यांत असतात. मात्र सध्या ते कॉंग्रेसवर नाराज असल्याचे वृत्त येत आहे. मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले होते. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकरणातही मध्यप्रदेशातील भूकंपानंतर रंग चढू लागला आहे.

बाटलीबंद पाण्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये, केरळ सरकारचा निर्णय.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *