मजुरांना घेऊन जाणार्‍या बसचा अपघात, ४ जणांचा मृत्यू तर २२ जण जखमी.

कोरोनाचा प्रादुर्भाव व देशात चालू असलेले लॉकडाउन यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतरण होत आहे. स्थलांतर करतांना मजुरांच्या गाड्यांचा अपघात झाल्याच्या विविध घटना घडत आहे. तशीच घटना यवतमाळ मध्ये घडली आहे. यवतमाळमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसनं टिप्परला धडक दिल्यानं मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील ४  जणांचा मृत्यू झाला असून त्यात एसटी ड्रायव्हरचाही समावेश आहे. तर २२ जण जखमी आहेत. यवतमाळच्या आर्णी नजिकच्या कोळवन गावात हा अपघात झाला. सध्या जखमींवर आर्णीच्य गामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस मजुरांना घेऊन सोलापुरहून झारखंडच्या दिशेनं निघाली होती.

आर्णी तालुक्यात हा भीषण झाला असून मजुरांना घेऊन जाणार्याी बसने टिप्परला मागून धडक दिल्याने बसच्या समोरील भागाचे नुकसान झाले असून अपघातात जखमी झालेल्या मजुरांना आर्णी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही एसटी सोलापूर येथून मजुरांना घेऊन झारखंडच्या दिशेने जात होती पण दुर्दैवाने वाटेतच हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मजुरांचे स्थलांतर सतत होत असून फाळणीनंतरचे सर्वात मोठे स्थलांतर चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. खिश्यात पैसे आणि  हाताला काम नसल्याने सध्या भरपूर मजूर आपल्या राज्याकडे स्थलांतर करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *