भोसरीचे भाजपा आमदार कोरोंनाबाधित, पत्नीलाही संसर्ग

पुण्यातील भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यासोबतच त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरीतील कोरोना रुगाणलयाचा दौरा केला होता. त्यावेळी त्या बैठकीला देखील आमदार महेश लांडगे उपस्थित होते. त्यांच्यावर आता चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार चालू असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात आले होते. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची त्यांनी यावेळी बैठक घेतली होती. या बैठकीला राज्यातील मंत्री तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला देखील आमदार महेश लांडगे हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे त्यांचा बर्या च लोकांशी संपर्क आला होता.

आमदार महेश लांडगे यांनी कोरोनाचे केंद्रबिंदू असलेल्या अनेक भगत जाऊन तेथील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता. त्यामुळे त्यांचा संपर्क मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्यांना कोरोनाचे लक्षण दिसून आले होते. त्यांची चाचणी केली असता त्यांचा रीपोर्ट पोझिटीव्ह आला असल्याची माहिती समोर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *